बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील शुभम कला अँकेडमीच्‍या अंतर्गत फुले शाहू आण्‍णाभाऊ अमर शेख विचार प्रतिष्‍ठानच्‍यावतीने कॉ. शाहीर अमर शेख जन्‍मोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती कार्याध्‍यक्ष मधुकर फरताडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
    हा कार्यक्रम सोहळा यशवंतराव चव्‍हाण सांस्‍कृतिक सभागृह येथे दि. 19, 20 व 21 रोजी दररोज दोन सत्रांत होत आहे. यामध्‍ये राज्‍यस्‍तरीय कवी संमेलन, जन्‍मोत्‍सव, राज्‍यस्‍तरीय शाहिरी जलसा, प्रतिमेची रॅली व समारोप अशा स्‍वरुपात कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांच्‍या हस्‍ते या सोहळ्याचे उदघाटन होत असून कवी संमेलनासाठी राजेंद्र मिरगणे, जन्‍मोत्‍सवासाठी विद्रोही चौथाव्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष अजीज नदाफ, शाहिरी जलसासाठी भाऊसाहेब आंधळकर, रॅलीसाठी माजी मंत्री उत्‍तमप्रकाश खंदारे, समारोपासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत हे उदघाटक आहेत.
    बार्शीचे सुपुत्र कॉं. शाहीर अमर शेख अमर शेख यांची कन्‍या मलिका नामेदव ढसाळ, माजी मंत्री लक्ष्‍मणराव ढोबळे, निर्माता शाहरी संभाजी भगत, माजी खासदार सुभाष देशमुख, पोलीस उपअधिक्षक रोहिदास पवार, मुख्‍याधिकारी दत्‍तात्रय लांघी, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, तहसिलदार बालाजी सोमवंशी, नगराध्‍यक्ष कादर तांबोळी यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमानिमित्‍त बार्शी व तालुक्‍यातील भुमिपुत्रांना जीवन गौरव पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे. वायुपुत्र नारायण जगदाळे, व्‍यंगचित्रकार खलील खान, ज्‍येष्‍ठ व्‍यापारी बाबासाहेब कथले, शिक्षण महर्षी बाळासाहेब कोरके, चित्रकार शशिकांत धोत्रे यांना स्‍मृतीचिन्‍ह, सन्‍मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्‍पगुच्‍छ देऊन जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
 
Top