उस्मानाबाद : बुधवार रोजी सायंकाळी लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्यावतीने नवरात्र दांडिया महोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. पहिल्या दिवशी मनवा नाईक तर दुसर्या दिवशी गुरुवारी उर्मिला कानेटकरच्या अदाकारीने तरुणाई घायाळ झाली.
या कार्यक्रमास 'तुझं माझं जमेना' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक, आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्षा श्रीमती पुष्पाताई पाटोदेकर, विद्यमान नगराध्यक्षा सौ. रेवती बनसोडे, लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चनाताई पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सन 2007 पासून उस्मानाबाद लेडिज क्लबच्या वतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी 9 ते 12 ऑक्टोबरदरम्यान दांडिया महोत्सवाचे आयोजन केले असून कार्यक्रम सायंकाळी 6 ते 10 या वेळेत होणार आहे. या महोत्सवामध्ये अनेक सिनेतारकांची उपस्थिती असणार आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार रोजी सुप्रसिध्द अभिनेत्री मनवा नाईक यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, अर्चनाताईंच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. याचा युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून गाण्यांच्या तालावर दांडिया खेळण्यासाठी त्यांनी ताल धरला. दांडिया महोत्सवात सहभागी ग्रुपची निवड केली जात आहे. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी मेघ मल्हार ग्रुपने प्रथम पारितोषिक पटकाविले. शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 'वाट माझी बघतोय रिक्षावाला'फेम मानसी नाईक यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी 'मराठी पाऊल पडती पुढे' हा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली.