श्रीनिवास भोसले
नळदुर्ग : गंधोरा (ता. तुळजापूर) येथील इंदिरा गांधी विद्यालयातील सहशिक्षक श्रीनिवास भोसले यांची जीवन विकास शिक्षण व शिक्षकेत्‍तर कर्मचारी पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी एकमताने निवड करण्‍यात आली आहे.
      तुळजापूर येथे 13 वर्षापूर्वी स्‍थापन झालेल्‍या जीवन शिक्षण व शिकत्‍तेतर कर्मचारी पतसंस्‍थेचे 97 सभासद संख्‍या असलेली शिक्षकांच्‍या जीवनात एक नवीन पहाट निर्माण करणारी अग्रगणी पतसंस्‍था म्‍हणून या संस्‍थेचा उल्‍लेख केला जातो. केवळ 12 टक्‍के व्‍याजदराने कर्ज देणारी ही पतसंस्‍था कांणत्‍याही बँकेचे कर्ज न घेता स्‍वताःच्‍या अथक जोरावर कार्यरत असुन या पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी इंदिरा गांधी गंधोरा येथे कार्यरत असलेले श्रीनिवास भोसले यांची एकमताने निवड करण्‍यात आली आहे. ही निवड संस्‍था उपाध्‍यक्ष विकास मोरे यांच्‍या उपस्थ्‍िातीत आयोजीत बैठकीत करण्‍यात आली. यावेळी पतसंस्‍था सचिव मालोजी थिटे माजी चेअरमेन शहाजी शिवकर, गुलमिर फकिर, विठठल सातपुते, सुरेखा मिटकरी, संध्‍या निंबाळकर, शोभा कसबे आदि संचालक उपस्थित होते. श्रीनिवास भोसले यांची निवड झाल्‍याबददल दवाखाना व लग्‍न यासाठी सभासदांना तात्‍काळ कर्ज पुरवठा करण्‍यात येईल व पतसंस्‍था पुढे नेण्‍यासाठी सर्व सभासदांना विश्‍वासात घेऊन स्‍वच्‍छ व पारदर्शक कारभार करणार असल्‍याचे सांगितले.
 
Top