![]() |
प्रतिकात्मक |
बुधवार दि. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास सदरची चर्चा जोरात सुरु झाली. यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता, मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचे आत नव्याने दाखल झालेली काही वाहने, प्रवेशद्वारावर त्यांचे सुरक्षा रक्षक ठाण मांडून बसल्याचे तसेच त्यांच्याकडून कोणालाही आत जाण्यास मज्जाव असल्याचे सांगण्यात आले. आतमध्ये तपासणी सुरु असून आम्हाला त्याबाबत कोणतीही माहिती देता येत नसल्याचे एकाने म्हटले.
सदरच्या घटनेनंतर राजकिय उलथापालथ झाल्यानेच ही कारवाई होत असल्याची चर्चा रंगत असून आयकर विभागाच्या अधिकृत माहितीशिवाय कोणतीही अधिकची माहिती देता येणार नाही. रात्री उशीराही तपासणीचे कामकाज सुरुच होते.