नळदु्र्ग : येथिल  कुरनूर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पातंर्गत  असलेल्‍या कालव्‍याद्वारे पाणी सोडल्‍याने जवळपास तीनशे हेक्‍टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांना फटका बसला असुन त्‍यामुळे शेतक-याचे मोठे नुकसान होत असल्‍याची तक्रारी आहेत. भविष्‍यात शेतक-याचे नुकसान टाळण्‍यासाठी प्रशासनाने कालव्‍याचे सिमेंटीकरण करुन पाण्‍याची नासाडी थांबविण्‍याची मागणी स्‍वाभिमानी शेतकरी युवक संघटनेच्‍यावतीने निवेदनाद्वारे जिल्‍हाधिका-यांकडे करण्‍यात आली आहे.
       कुरनुर सिंचन कालव्‍याच्‍या आजुबाजूला ज्‍या शेतजमीनी आहेत. नळदुर्ग ते खुदावाडी शहापुर या गावादंतर्गत जवळपास 250 – 300 हेक्‍टर जमीन कालव्‍यात पाणी सोडल्‍यानंतर ही सर्व जमीन सर्व शेतक-यांना या पाझ-यामुळे खरीप हंगामाला फटका बसत आहे. तरी कालव्‍याचे सिमेंटीकरण व कालवा स्‍वच्‍छता करण्‍याची मागणी शेतक-यांतुन होत आहे. जेनेकरुन  कालव्‍याचे  सिमेंटीकरण झाल्‍यास शेतक-यांचे होणारे नुकसान व पाण्‍याची  नासाडी थांबेल. कुरनुर सिंचन कालवा स्‍वच्‍छ करण्‍यासाठी शासनाने निधी वापरला  नाही. तरी संबंधीत अधिका-यांनी याप्रकरणी लक्ष घालुन शेतक-यांना या संकटातुन मुक्‍त करावे. अन्‍यथा स्‍वाभिमानी शेतकरी युवक संघटनेच्‍या वतीने तीव्र अंदोलन करण्‍याचा इशारा निवेदनाद्वारे स्‍वाभिमानी युवक संघटनेच्‍यावतीने देण्‍यात आला आहे. या निवेदनावर तुळजापूर तालुका उपाध्‍यक्ष सुनील चौधरी, नळदुर्ग शहराध्‍यक्ष मुन्‍ना इनामदार, सुनील कसेकर, किरण जाधव, सुरेश नागणे, प्रशांत शहाणे, मल्‍हारी कोकरे, विशाल मोरे, आशिया इनामदार, संतोष कनकधर आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
 
Top