नळदुर्ग -: येथील प्राचीन असलेल्‍या श्री जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्‍थान ट्रस्‍ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जिर्णोध्‍दार समितीच्‍यावतीने नवरात्र महोत्‍सवानिमित्‍त खुल्‍या गटासाठी भव्‍य रांगोळी स्‍पर्धा रविवार दि. 6 ऑक्‍टोबर रोजी घेण्‍यात आली. या स्‍पर्धेमध्‍ये 36 स्‍पर्धक सहभागी झाले होते. आकर्षक रांगोळीच्‍या माध्‍यमातून अनेक स्‍पर्धकांनी समाजातील ज्‍वलंत विषयावर प्रकाशझोत टाकले.
 
नवरात्र महोत्‍सवानिमित्‍त रविवार रोजी भव्‍य खुल्‍या रांगोळी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेचे शुभारंभ उपनगराध्‍यक्षा सौ. अर्पणाताई बेडगे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी सौ. गिता पुदाले, सौ. वंदना बागल यांची प्रमुख उ‍पस्थिती होती. तर परीक्षक म्‍हणून दमयंती महिला शिक्षक संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा सौ. सुभद्राताई मुळे, सौ. मिनाक्षीताई काळे, सौ. कविता पुदाले-उकंडे, सौ. शोभा ठाकूर, किणीकर ए.जी., थोरबोले आर.टी., अपर्णा बेडगे यानी काम पाहिले. 
रांगोळी स्‍पर्धेत अनेक स्‍पर्धकांनी सध्‍याच्‍या महिलांवरील वाढते अत्‍याचार, पर्यावरण, स्‍त्रीभ्रूण हत्‍या, मुली वाचवा देश वाचवा, झाडे लावा देश वाचवा, भवानी माता, पानातला गणपती, मीठाची रांगोळी, उगवता सूर्य, नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील कोसळणा-या 'नरमादी' धबधब्‍यासह समाजातील अनेक विषयावर आकर्षकरित्‍या रांगोळीच्‍या माध्‍यमातून साकारल्‍याने स्‍पर्धकांचे कौतुक केले जात आहे. या स्‍पर्धेत विद्यार्थिनी, गृहिणी असे मिळून जवळपास 36 स्‍पर्धक सहभागी झाले होते. या स्‍पर्धेतील विजेत्‍या स्‍पर्धकांना शनिवार दि. 12 ऑक्‍टोबर रोजी पारितोषिक देऊन गौरविण्‍यात येणार आहे. स्‍पर्धा यशस्‍वी करण्‍यासाठी विनायक अहंकारी, शरद बागल, दत्‍तात्रय वाघमारे, बाळकृष्‍ण महाबोले, सुनील उकंडे, सौरभ रामदासी, मंदार पुदाले, सरदारसिंग ठाकूर, शरणाप्‍पा शंकरशेट्टी, सुधीर हजारे, सुरेश गायकवाड, अमृत पुदाले, रमेश जाधव आदीनी पुढाकार घेतले. रांगोळी स्‍पर्धेदरम्‍यान अँड. अरविंद बेडगे, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरीक, महिला वर्ग यांनी आदींनी भेट दिली.
 
Top