देशभरात मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. देवभुमी म्हणून ओळखल्या जाणा-या या प्राचीन भारतभुमीत अनेक देवस्थाने आहेत. यापैकी अनेक देवस्थानांना हजारो वर्षे राजाश्रय व लोकाश्रय लाभल्यामुळे त्यांची श्रीमंतीही मोठीच आहे. काही मंदीरे आर्वाचीन आली तरी भक्तांनी मुक्त हस्ते दिलेल्या देणग्यांमुळे त्यांच्याही संपतीत वाढ झालेली आहे. काशीतील विश्वनाथ मंदिर, श्रीरंगमसारखे अख्ख्या गावाची व्याप्ती असलेले मंदीर, उडुपीतील किंवा गुरूवायूरचे श्रीकृष्ण मंदिरासारख्या अनेक प्राचीन मंदीराचे महात्म्य व श्रीमंतीही मोठीच आहे. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदीरही त्यापैकीच एक आहे. देशातील अशाच काही सर्वात श्रीमंत देवस्थानांची ही माहिती.....
पद्मनाभस्वामी मंदीर
केरळमधील तिरूवनंतपूरम येथील पदमनाभस्वामी मंदीराची श्रीमंत अलिकडेच येथील खजिना उघड झाल्यामुळे जगासमोर आली. मंदीराच्या सहा तळघरांमध्ये या देवस्थानाचा खजिना भरलेला आहे. त्रावणकोर संस्थानाच्या मालकीचे हे मंदीर शेकडो वर्षापासून हिरे, सोने, चांदी यांच्या राशीने भरलेले आहे या देवस्थानची संपत्ती सूमारे 1 लाख कोटी इतकी आहे असे सध्या मानले जात आहे.

तिरूमला तिरूपती
आंध्र प्रदेशातील हे प्रसिध्द देवस्थान आता देशातील दुस-या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान ठरले आहे. या मंदीराला रोज साठ हजारापेक्षाही अधिक भक्त भेट देतात. या ठिकानी सोन्या चांदीचे दागिने देवाला अर्पण करण्याची प्रथा जून्या काळापासूनच आहे. दरवर्षी या मंदीराला अशा देणग्यांमधून सूमारे 650 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते.
वैष्णोदेवी मंदीर
देवीचे हे स्थान देशभरातील भक्तांना आकर्षित करते. महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीचे एकत्रित दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी येत असतात. कश्मीरमधील हे देवस्थान देशातील सर्वात जून्या देवस्थानांपैकी एक आहे. येथे दरवर्षी 4.5 दशलक्ष भाविक येतात. या देवस्थानचे वार्षिक उत्पन्न 500 कोटी रूपये आहे.

देशातच नव्हे तर जगभरात शिर्डीच्या साईबाबांचे भक्त आहेत.शिर्डीच्या मंदिरात जावुन बांबाच्या समाधीचे दर्शन घेण्याची ओढ अनेक भक्तांना दुरवरून खेचुन आणते. अशा भक्तानी मुक्त हस्ते अर्पण केलेल्या देणग्यामुळे अल्पावधीतच हे देवस्थान श्रीमंत बनले आहे. दरवर्षी या मंदिराला 350 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते.
सोमनाथ मंदिर
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले सोमनाथ मंदिर गुजरातमध्ये सौराष्ट्रात प्रभासक्षेत्रात आहे. प्राचीन काळापासूनच प्रसिध्द आणि श्रीमंत असलेल्या या देवस्थानावर अनेक वेळा परकीय अक्रमणे झाली. स्वातंत्रयोत्तर काळात देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने या मंदिराचा जिर्णोद्वार झाला.

सुवर्णमंदिर
पंजाबमधील अमृतसर येथे असलेले सुवर्णमंदिर हे शिखांच्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. तेथे दिवसाला 40 हजार भक्त भेट देत असतात. सोन्याची झळाळी असलेल्या या मंदिराचे उत्पन्नही त्याच तोलामोलाचे आहे.

सिध्दिविनायक मंदिर
मिनाक्षी मंदिर
तामिळनाडुतील मिनाक्षी मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना म्हणुन ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षापुर्वीचे ह मंदिर तेथिल उंच गोपुरांसाठीही प्रसिध्द आहे. सर्वात उंच गोपूर 170 फुट उंचीचे आहे. या मंदिराला रोज सुमारे पंधरा हजार लोक भेट देतात. मंदिराला दरवर्षी सुमारे सहा कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते.

जगन्नाथपुरी
ओडिसातील पुरी येथील जगन्नाथपुरी मंदिर प्राचिन काळापासुनच तीर्थयात्रेत समाविष्ठ झालेले आहे. तेथिल भगवान जगन्नाथ, बलभद्र व देवी सुभद्रा यांचा वार्षिक रथोत्सव जगभरातील भाविकांना अकर्षित करतो. असंख्य भाविक या मंदिराल भेट देत असल्याने मंदिराचे उत्पन्नही मोठे आहे.

गुरूवायुर मंदिर
केरळमध्ये हे प्रसिध्द श्रीकृष्ण मंदिर आहे. सुमारे एक हजार वर्षापुर्वीच्या या मंदिराल अनेक भाविक भेट देत असतात . या मंदिराचे उत्पन्नही मोठे आहे. जन्माष्टीसारखे अनेक उत्सव येथे थाटामाटात साजरे होत असतात.