उस्मानाबाद :- भारत निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी-5 औरंगाबाद यांनी 1 नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्याचे पुनरीक्षण कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून  मतदार नोंदणी कार्यक्रम /सूचना जाहीर केली आहे. या सूचनाच्या प्रती सर्व शासकीय कार्यालय, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, व्यवसायीक संस्था, बँकेच्या नोटीस बोर्ड आदि ठिकाणी प्रसिध्दी केली आहे, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top