उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील नियम 142 (1) नियमान्वये 16 ऑक्टोबर, रोजी बकरी ईद सणानिमित्त जिल्ह्यातील सर्व प्रकारची दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्व देशी /विदेशी, एफएलबीआर-2, परवाना कक्ष, ताडी विक्री केंद्र तसेच मदय विक्री बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहे, याची सर्व सबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.