बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मळेगाव (ता. बार्शी) येथील जवान चंदीगड येथे शहिद झालेल्या संजीव बुद्रुक याला ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. मळेगाव येथील नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर ना.मा.गडसिंग गुरुजी मित्र विदयालयाच्या प्रांगणात शहिद जवान बुद्रुक यांच्यावर दुपारी मंगळवारी सव्वादोन सुमारास अंत्यंसंस्कार करण्यात आले.
संजीव बुद्रुक हा शहीद झाल्याची वार्ता मिळाल्यापासून त्याला भावपूर्ण मानवंदना देईपर्यंत संपूर्ण गावकरी, नातेवाईक व त्याच्या मित्र परिवारात त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी अत्यंत शांत, प्रेमळ, निरागस, इतरांना सातत्याने सहकार्य करणा-या संजीवची माहिती इतरांना सांगण्यात येत होती.
देशाच्या सेवेत नोकरी करत असलेल्या शहीद ब्रद्रुक यांचे पार्थिव घेऊन कमांडर मेजर चिन्नाप्पा सी.जी., टी.बी. चौगुले, सुबेदार मेजर राजेंद्र देसाई, 27 राष्ट्रीय राईफल सुवेदार पांडुरंग गवस, मेकनाईक एनफन्ट्री रेजिमेंट सेंटर अहमदनगर येथील लष्करी जवानांचे पथक, जवान संतोषकुमार, रामकृपाल प्रसाद, विनय सिंग, सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी केरबा बोबडे व सहकारी यांनी तिरंग्यात लपेटलेल्या शहिद जवानाचे पार्थिव मळेगाव येथे आणले. बुद्रुक यांच्या घरात पार्थिव आणल्यानंतर त्यांच्या घरातील रितीरिवाजाप्रमाणे त्याचे औक्षण करण्यात आले.
यावेळी गावातील सर्व शाळांच्या विदयार्थ्यांनी अत्यंत शिस्तीत शहिद जवानाच्या शोभायात्रेत होऊन शहिद जवान अमर रहे च्या घोषणा देत सहभाग नोंदविला. गावातील व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, तहसिलदार बालाजी सोमवंशी, पोलीस उपअधिक्षक रोहिदास पवार, पोलीस उपनिरीक्षक शरद मेमाणे, सरपंच गुणपंत मुंढे, गंगाताई माळी, संजय आळतेकर, शिवाजी पवार, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद ननवरे आदी उपस्थित होते. शहीद ब्रद्रुक यांच्यावर अंत्यसंस्कार करताना जवानांच्या एका तुकडीने हवेत फैरी झाडून सलामी दिली.