सोलापूर :- महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक साविव्य/1005/प्र.क्र.2075/ना.पु.28, दिनांक 3 नोव्हेंबर 2007 अन्वये सध्याची रास्त भाव दुकाने/ किरकोळ केरोसीन परवाना तसाच ठेवून, आजमितीस रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची रास्त भाव धान्य दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहाय्यता गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जेथे स्वयंसहाय्यता गट उपलब्ध होणार नाहीत अशा ठिकाणी सध्याच्या प्राथम्य सुचीनुसार रास्त भाव धान्य दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यात यावेत असाही निर्णय शासनाने घेतला आहे.
    मौजे डोणज, मौजे रहाटेवाडी व भालेवाडी ता. मंगळवेढा येथे कायमस्वरुपी रास्त भाव धान्य दुकान परवाना देण्यात येणार आहे. मौजे डोणज, मौजे रहाटेवाडी व भालेवाडी या गावातील सर्व बचत गटांना कळविण्यात येते की, ज्या बचत गटांना मौजे डोणज, मौजे रहाटेवाडी व भालेवाडी या गावात रास्त भाव धान्य दुकान परवाना चालविण्याची इच्छा असेल त्यांनी विहित नमुन्यात तहसिलदार मंगळवेढा कार्यालय येथे दिनांक 14 ऑक्टोंबर 2013 पासून 31 ऑक्टोंबर 2013 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज कार्यालयीन  वेळेत स्विकारले जातील. अर्जदाराने अर्ज स्वत: सादर करावेत. अर्जाचे विहित नमुन्यातील कोरे फॉर्म तहसिलदार मंगळवेढा यांचे कार्यालयात रक्कम रु. 5/- च्या चलनाने सरकारी खजिन्यात जमा करुन घेवून दिले जातील. यापुर्वी या ठिकाणी काढण्यात आलेले जाहिरनामे रद्द समजण्यात यावेत.
    रास्त भाव दुकान मंजुरीसाठी बचत गटाची गुणानुक्रमे निवड करण्यात येईल.
    अर्जासोबत खालील प्रमाणपत्राच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. गट अस्तित्वात असलेला कालावधी - बचत गटाच्या दिनांक 1 जानेवारी 2009 पूर्वीच्या स्थापनेबाबतचे बँकेच्या खात्याचे पासबुक/ बचतगट स्थापने बाबतचे बँकेचे पत्र. गटातील सभासद संख्या - गटातील सभासद संख्येचे प्रमाणपत्र सादर करावे, गटाची बैठक (इतिवृत्त पुस्तक तपासावे) - बचत गटाचे बैठका ठरलेल्या ठिकाणी व ठरलेल्या वेळेत होत असलेबाबत कागदपत्र तसेच बेठकीस उपस्थितीबाबत कागदपत्र, गटातील सभासदत्व - बचत गटात गरीब, गरजु, मजुर, भुमीहीन, विधवा, परित्याक्त्या महिलांचा समावेश असलेस त्याबाबत कागदपत्र, गटाचे लेखे लिहिणे - बचत गटाचे जमाखर्च, पासबुक व हिशोब नोंदवह्या, बचत गटाचे लेखा परिक्षण - बचत गटाचे लेखा परिक्षण  झालेबाबत अहवाल, विमा - बचत गटाच्या सभासदांनी विमा उतरविलेला असलेबाबत कागदपत्र. मागासवर्गीय सभासदांची संख्या - बचत गटातील सभासद मागासवर्गीय असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र, सर्व साधारण शैक्षणिक पात्रता - बचत गटाच्या सभासदांची शैक्षणिक पात्रता दर्शविणारे कागदपत्रे, दारिद्रय रेषेखालीलसभासदांची संख्या - सभासद दारिद्रय रेषेखालील असल्यास शिधापत्रिका/ ग्रामसेवकांचे पत्र, स्वबचत - बचत गटांची आर्थिक व्यवहाराची माहिती दर्शविणारे पत्रक (1. बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत, सभासदांना वाटप केलेले कर्ज व त्याची वसुली केलेबाबतचे पत्रक), खेळते भांडवल - गत तीन वर्षाचे ताळंबंद पत्रक व खेळत्या भांडवलाबाबत आवश्यक कागदपत्रे, बँकेचा सहभाग - बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्याच्या संबंधीत कागदपत्रे व सदर कर्ज नियमित भरत असलेबाबतचा पुरावा, जागा - जागेबाबत कागदपत्र (1. स्वत:ची जमिन असल्यास ग्रामपंचायतीचा 8 अ/ सिटी सर्व्हेचा उतारा 2. भाड्याची जागा असल्यास ग्रामपंचायतीचा 8 अ/ सिटी सर्व्हेचा उतारा व रुपये 100/- च्या स्टँम्पवर जागा मालकीचे संमतीपत्र) इतर वैशिष्टये पूर्ण कामाबाबतचा अहवाल व त्याबाबतचा पुरावा - (राष्ट्रीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक स्तरावरील प्रदर्शनामध्ये व इतर शासकीय योजनेमधील सहभाग) या सहभागाबाबत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद यांचे प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनेमधील सहभागाबाबत संबंधित जिल्हास्तरीय शासकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र जोडावे.               
 
Top