द्राक्ष पिकाचा विमा रक्कम भरण्याची अंतिम मुदत दिनांक 15 ऑक्टोंबर 2013 अखेर व डाळिंब, मोसंबी, पेरु पिकासाठी दिनांक 31 ऑक्टोंबर 2013 आहे.
विविध वित्तीय संस्थांकडे पिक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्याची अधिसूचीत पिकासाठी पिक कर्ज मर्यादा मंजूर आहे अशा सर्व शेतक-यांना ही योजना सक्तीची राहिल. बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजना ऐच्छिक राहील.
द्राक्षे रुपये 9000/-, मोसंबी (आंबियाबहार) रुपये 3600/-, डाळिंब (हस्तबहार) रुपये 6000/-, पेरु (हस्तबहार) रुपये 1800/- हप्ता विमापोटी भरावयाचा आहे.
विमा योजनेसंबंधी सविस्तर माहिती मंडळ कृषि अधिकारी, मंडळ स्तर, तालुका कृषी अधिकारी, तालुका स्तर, उप विभागीय कृषि अधिकारी, सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर येथे उपलब्ध आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.