कळंब -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात सध्‍या सुरु असलेल्‍या एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रमाच्‍या अंमलबजावणीसाठी गावातील शेतकरी मंडळांनी आता सक्रिय व्‍हावे, असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी केले.
    शेलगांव (दि.) ता. कळंब येथे शुक्रवार दि. 12 ऑक्‍टोबर रोजी वसुंधरा राज्‍यस्‍तरीय विकास यंत्रणा, एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रम, कळंब व पाणलोट विकास केंद्र उस्‍मानाबाद, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब, ग्रामपंचायत कार्यालय व पाणलोट विकास समिती, शेलगांव (दि.) ता. कळंब यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
    सदरील कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी पाणलोट समितीचे सचिव विठ्ठल दिवाणे, उपसरपंच खंडेराव भातलवंडे, राजेंद्र काकडे व गावातील सर्व लोक प्रतिनिधी, युवक मंडळाच्‍या सदस्‍य आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास गावातील शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आण्‍णा सातपुते यांनी केले.
 
Top