नळदुर्ग -: शिवसेनेच्यावतीने मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर भव्य दसरा मेळावा होत असून या दसरा मेळाव्यासाठी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिरातून भवानी ज्‍योत घेऊन शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत.  सर्वप्रथम ही ज्‍योत तुळजापूरला आई तुळजाभवानीच्‍या मंदिरात जाणार आहे. उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघातील 33 देवी मंदिरातून प्रत्‍येक एक ज्‍योत अशा एकूण 33 ज्‍योती तुळजापूर ते शिवाजी पार्कपर्यंत ज्‍योत दौड निघणार आहे. नळदुर्ग येथून शिवसेनेचे तालुकाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर घोडके, शहरप्रमुख संतोष पुदाले, येडोळा येथील राजेंद्र जाधव, अतुल डोंगरे, दयानंद घोडके, सुर्यकांत घोडके, शाम कनकरधर, शंकर चव्‍हाण हे अंबाबाईच्‍या मंदिरातून ज्‍योत घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.
 
Top