![]() |
प्रतिकात्मक |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुक्यातील गायी, म्हशी व बैल आदी जनावरांपैकी अनेक जनावरांना खरकुत या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. येथील शासकिय पशू वैद्यकिय दवाखान्यात सदरच्या रोगावरील लस व उपचारपध्दतीसाठी नाममात्र १ रुपयांत उपचार होत असून त्याचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन वैद्यकिय अधिकारी बिराजदार यांनी केले आहे.
दुष्काळ परिस्थितीत सांगोला आदी भागात सुरु केलेल्या जनावरांच्या छावण्यांतून सदरच्या रोगाचा प्रसार झाला. तेथील काही बैल, खिलार खोंड व म्हैस बार्शीतील काहीजणांनी विकत आणल्या त्यांच्यापासूनच सदरच्या संसर्गजन्य रोगाची लागण इतर जनावरांना झाल्याने वेळेत लसीची मात्रा जनावरांना देण्याची गरज आहे. जनावरांच्या रोगांपैकी घटसर्प आणि खरकुत हे रोग जास्त प्रचलित आहेत. त्यापैकी घटसर्प या रोगावर वेळेत उपचार न केल्यास जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. खरकुत रोगामुळे जनावरांना ताप येणे तोंडातून लाळ येणे, नखी जवळील कातडी ढिले होऊन काही ठिकाणी नखी पूर्णपणे निघणे, लखडणे आदि लक्षणे दिसून येतात. वेळेत उपचार करणे गरजेचे असते व प्रमाणापेक्षा जादा प्रादुर्भाव झाल्यास जनावर दगावण्याचीही शक्यता असते परंतु त्याचे प्रमाण फार कमी असते. शासकिय रुग्णालयात ङ्कुबलक प्रङ्काणात लस उपलब्ध असून प्रत्येक जनावरांसाठी नवीन सुईचा वापर करण्यात येतो. सार्वजनिक ठिकाणी जनावरांना पाणी पाणजे, अनेक जनावरे एकत्र पाण्यात सोडणे इत्यादी प्रकार टाळणे गरजेचे असते. काही व्यक्तींमध्ये गैरसमजही असल्याने या लसीकरणामुळे जनावर गाभडणे, दुध कमी येणे, गाठी येणे, सुजने असे होत असल्याची अंधश्रध्दा अशिक्षीत लोकांमध्ये आहे. यामुळे अनेक जण या लसीकरणासाठी आपली जनावरे दवाखान्यात आणत नाहीत. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीस अथवा मान्सूनपूर्व घटसर्प या रोगावरील लस देण्यात येते. पावसाळा समाप्तीच्या वेळी खरकुताच्या रोगावरील लस देण्यात येते. या रोगासाठी प्राथमिक उपचार म्हणून खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून तोंड धुणे, निरम्याच्या अथवा वॉशींग पावडरच्या पाण्यामध्ये पाय धुणे, तोंडास बोरॅक्स पावडर लावणे, पायाजवळ माशी बसू नये म्हणून औषध अथवा डांबर लावणे आदी प्रथमोपचार करता येतात.