बार्शी : शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने सोमवार दि.१४ ऑक्‍टोबर रोजी मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा युवक अध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिली.
    यामध्ये ऊसदर, तालुका कृषि विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी, महावितरणची वीज तोड मोहिम, रास्त भाव दुकानदाराकडून होणारी लूट, वीजेचे लोडशेडींग, धान्य उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई, कॅनलचे कामकाज, शेती मालास हमीभाव इत्यादी प्रश्‍न आहेत.
 
Top