हैदराबाद - फायलिन चक्रीवादळ ओडीशाच्‍या किना-यापासून केवळ 75 किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. चक्रीवादळ धडकण्‍यापूर्वीच पावसाचा कहर सुरु झाला आहे. ओडीशामध्‍ये 3 जणांचा मृत्‍यू झाला आहे. वादळी वा-यामुळे काही ठिकाणी झाडे उन्‍मळून पडली. त्‍याखाली दबून तिघांचा मृत्‍यू झाला. मृतांमध्‍ये एका महिलेचा समावेश आहे. जगतसिंगपूर जिल्‍ह्यात गरामा गावात एका 35 वर्षीच्‍य पुरुषाचा मृत्‍यू झाला. तर 42 वर्षांची महिला भुवनेश्‍वरमध्‍ये मृत्‍यूमुखी पडली. तिसरी घटना गंजम जिल्‍ह्यात घडली. मृतकांची ओळख पटलेली नाही.
    ओडीशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्‍ये एनडीआरएफचे 2 हजार जवान आपात्‍पालीन परिस्थितीचा सामना करण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 5.5 लाख नागरिकांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍यात आले आहे. यापूर्वी 1990 मध्‍ये आंध्र प्रदेशमध्‍ये 6 लाख लोकांना हलविण्‍यात आले होते. यावेळी 50 बचाव पथके विविध ठिकणी तैनात करण्‍यात आली आहेत.
    दरम्‍यान, फायलिनमुळे पश्चिम बंगालमध्‍येही मुसळधार पावसाचा इशारा देण्‍यात आला आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला असून ते नवी दिल्‍लीला परतले आहेत. प्रणव मुखर्जी त्‍यांच्‍या गावी दुर्गा पुजेसाठी गेले होते. परंतु, मुसळधार पावसाचा इशारा देण्‍यात आल्‍यानंतर त्‍यांनी परतण्‍याचा निर्णय घेतला.

ओडीशा सरकारने दिलेले आपात्‍कालीन दूरध्‍वनी क्रमांक...
पुरी: 06752-223237
गजपति: 06815-222943
गंजम: 06811-263978
जगतसिंहपुर: 06724-220368
बालासोर: 06782-262286
भद्रक: 06784-251881
 
Top