नळदुर्ग -: विवार दि. 6 ऑक्‍टोबर रोजी अणदूर (ता. तुळजापूर) येथे फिनिक्स इंग्लिश स्कूलच्यावतीने आयोजित पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    तुळजापूर तालुक्‍यातील अणदूरच्‍या श्री निलकंठेश्वर मंदिराच्या सभागृहात या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेताजी क्षीरसागर, जयर्शी माने, रुपाली सावंत, फकीर हाबीब, अरविंद घोडके, अण्णासाहेब घुगे, राजेंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी 10 वर्षांपूर्वी लावलेले फिनिक्स इंग्लिश स्कूलचे रोपटे आज वृक्ष झाल्याचे तसेच भविष्यात याचे वटवृक्षात रुपांतर होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मेळाव्यास सेवानिवृत्त मुख्याध्यापक आरबळे, मुख्याध्यापिका सीमा ढेपे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top