उस्मानाबाद : राष्‍ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कळंब येथील कार्यकर्त्यांनी आराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रविवार दि. 6 ऑक्‍टोबर रोजी हा सोहळा पार पडला यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड. आयुब पठाण, माजी तालुकाध्यक्ष शहानवाज शेख, खाजामियाँ शेख आदींनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार पाटील यांनी स्वागत केले. यावेळी कळंब नगरपालिकेचे नगरसेवक बाळकृष्ण भंवर, प्रशांत लोमटे, कैलास पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, अफरोज पिरजादे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top