मुंबई -: नवोदित अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाला सध्या चांगलेच ग्लॅकर मिळाले आहे. अनेक नामांकित जाहिरात संस्थांनी तिच्यासोबत कोट्यावधीचे करार केल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. 'स्टुडंट ऑफ दि इयर' मधून जबरदस्त एंट्री करणा-या आलियाने सध्या आपला मोर्चा बिग बजेट चित्रपटांकडे वळविला असून ती चित्रपटाच्या संहितांचा बारकाईन अभ्यास करते आहे. व्यावसायिक पातळीवर एवढे चांगले यश मिळाले असले तरीसुध्दा मी आजही स्टार नाही, अशी मनमोकळी कबुली तिने माध्यमांशी बोलताना दिली.
आलिया लवकरच इम्तियाझ अलींच्या 'हायवे' आणि करण जोहरच्या 'टू-स्टेट्स' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यासाठी ती बरेच परिश्रम घेत असून या दोन्ही चित्रपटांकडुन तिला खुप अपेक्षा आहेत. करिअरबाबत अधिक भाष्य करताना ती म्हणाली, 'मला अभियनाचा तितकासा अनुभव नाही. त्यामुळे मला स्टार संबोधणे पुर्णपणे चुकीचे आहे. सध्या मी शिकत असून मला या क्षेत्रामध्ये आणखी बरेच दिवस परिश्रम करावे लागतील. त्यानंरतच माझी स्वतंत्र ओळख तयार होईल.'
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी वेळ उपलब्ध व्हावा, म्हणून तिने आता जाहिरातींची कामे घेणेही बंद केले आहे. केवळ वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटामध्येच काम करण्यावर तिने लक्ष केंद्रित केलयाचे दिसून येते. सध्या बॉलीवूडमधील अनेक बडे बॅनर आलियाला संधी देण्यास उत्सुक आहेत. पण तिने मात्र चित्रपटाच्या स्क्रिप्ट पाहूनच भुमिका स्विकारायचे ठरविले आहे.