उमरगा :-  मुळज तांडा (ता. उमरगा) येथील विनायक शिवाजी राठोड (वय 22 वर्ष) हा युवक दि. 23 सप्टेंबर रोजी  घरातून निघून गेला आहे. या युवकाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी  पोलीस ठाणे, उमरगा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन,ता. उमरगा  यांनी केले आहे. सदर मुलगा  रंगाने काळा सावळा आहे.  त्याची  उंची अंदाजे 145 से.मी.अंगावर पांढरा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट, पायात काळया रंगाची प्लॉस्टीक चप्पल अशा वर्णनाचा असून तो भोळसर व अडाणी स्वभावाचा आहे.
 
Top