कोल्हापूर : नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज श्री महालक्ष्मीची सिंहासनारूढ रुपातील पूजा बांधण्यात आली. अत्यंत वैभवशाली आणि प्रसन्न अशी ही देवीची सिंहासनारूढ रुपातील पूजा अतिशय आकर्षक आणि नयनमनोहर होती. आज देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ही पूजा श्री पूजक दत्तत्रय ठाणेकर, अजित ठाणेकर, उमेश उदगावकर, गजानन जोशी, संजय सामानगडकर, मनोज ढवळे यांनी बांधली.