कळंब -: वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास प्रकल्प हा केंद्र शासनाचा 90 टक्के निधी व राज्य शासनाचा 10 टक्के निधी असलेला महाराष्ट्रातील एक महत्त्वांकाक्षी प्रकल्प आहे. तो यशस्वी करण्यासाठी गावातील शेतकरी, महिला व लोक प्रतिनिधी एकत्र यावे व सदर योजना यशवी करावी, असे आवाहन पत्रकार शिवाजी कांबळे यांनी केले.
मौजे दहिफळ (ता. कळंब) येथे शुक्रवारी वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट व्यवस्थापन केंद्र, यशदा-पुणे, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, तालुका कृषी अधिकारी तुळजापूर, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जाणीव जागृती कार्यक्रमात शिवाजी कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.
प्रारंभी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर बंटी देडे व त्यांचा कला संच यांनी कला पथकाच्या माध्यमातून पाणलोट प्रकल्पाबाबत प्रबोधन केले. या कार्यक्रमास शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाणलोट समितीचे सचिव सुशेन पाटील, परिवर्तन सामाजिक संस्थेचे प्रकल्प सहाय्यक अण्णा सातपुते यांनी परिश्रम घेतले.