उस्मानाबाद :- नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ संकरीत 6 गायी, म्हशी पालन, मांसल कुक्कुटपालन व्यवसाय व अंशत: ठाणबंध शेळी पालन व्यवसाय करणे, लाभार्थ्यांची निवडीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-30 वाजता मांसल कुक्कुटपालन व्यवसाय, दु.1-15 वाजता संकरीत दुधाळ 6 गायी व म्हशी वाटप, दु.3.15 वाजता अशंत: ठाणबंध शेळी या गटाच्या योजनेतील लाभार्थींची निवड सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे.
कुक्कुट प्रकल्प,उस्मानाबाद येथे लाभधारकांनी वेळेत हजर रहावे, असे सदस्य सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. भोसले यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी / पंचायत समिती या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.