उस्मानाबाद : एका भरधाव ट्रक्‍टरने धडक देऊन झालेल्‍या अपघातात वृध्‍द इसम जागीच ठार झाल्‍याची घटना उस्‍मानाबाद शहरातील झोरी गल्‍ली परिसरात शुक्रवार रोजी दुपारी पावणे तीन वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी टॅक्‍ट्रर चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
    हमीद गफूर शेख (वय ६० वर्षे, रा. खाजानगर, उस्‍मानाबाद) असे अपघातात ठार झालेल्‍या वृध्‍दाचे नाव आहे. यातील हमीद शेख हे शुक्रवार रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास झोरी गल्ली येथील रोडवरुन घरी परतत असताना त्यांना तुळजापूर रोडवर ट्रक्टर (क्र.एम.एच.२५ /६५०९) चा चालक अशोक दगडू शेटे यांनी आपल्या ताब्यातील ट्रक्टर निष्काळजीपणे चालवून शेख यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.
    बाबत शिराज हमीद शेख याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक्टर चालक शेटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत.
 
Top