अणदूर (सोमनाथ बनसोडे) - सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणूदर (ता. तुळजापूर) या गावात चोरट्यांनी हैदोस घातले असून घरफोडी करुन रोख रक्कम, सोने व मोटारसायकल असे मिळून एकूण जवळपास 50 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र बाबुराव चव्हाण यांचे कार्यालय चोरट्यांनी पुन्हा फोडले. मात्र या घटनेत चोरट्यांनी काहीही चोरुन नेले नाही, मात्र कागदोपत्रांची नासधूस करण्यात आली आहे.
पालकमंत्री ना. चव्हाण यांचे सुपुत्र बाबुराव चव्हाण यांचे अणदूर बसस्थानकसमोर मधुशाली नगरमध्ये कार्यालय आहे. गेल्या महिन्यात चोरट्यांनी हे कार्यालय फोडून लॅपटॉप चोरला होता, तसेच एक घरफोडीही केली होती. चोरट्यांनी शुक्रवार रोजी पहाटेपूर्वी पुन्हा हैदोस घालून हे कार्यालय फोडून कागदोपत्रांची नासाडी केली. त्याचबरोबर मधुशालीनगरमधील भास्कर रामचंद्र मुळे यांचे घर फोडून सहा ग्रॅम सोने आणि रोख दहा हजार रूपये लंपास केले,तसेच डॉ.स्वामी यांची मोटारसायकल (क्रं. एमएच 13 एएम 9205 ) चोरट्यांनी चोरून नेली आहे.
अणदूर गावांत विशेषत: मधुशालीनगरमध्ये वांरवार चो-या होत असल्यामुळे या भागात राहणा-या नागरिकांत घबराट पसरली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.