उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने 18 ते 35 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतीसाठी दि. 28 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत (ईडीपीचे) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकता स्वत:मध्ये कशी रुजवावी, लघु उद्योग व उत्पादन, एसएस आय रजिस्ट्रेशन, एम आय डी सीतील भूखंड, आय एस आय ट्रेडमार्कची माहिती, लोगो परवाना, उद्योगाला लागणारे परवाने, उद्येाग कसा व कोणता निवडावा, कच्चा माल, आकर्षक पॅकिंग, अन्न व भेसळ व औषधी वनस्पती, धान्य प्रक्रिया उद्योग, फुड टेक्नॉलॉजी, संभाषण कौशल्य, बॅकींग, खरेदी विक्री, नाबार्डच्या योजना, आदि उद्योग धंदा उभारण्याची साविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक व अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असून इच्छुक युवती व महिलांनी प्रवेशासाठी अर्ज व अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक एस. एस. गायकवाड (भ्रमणध्वनी क्रमांक 9011219701) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पांडुरंग कांबळे, क. प्रकल्प अधिकारी एमसीइडी,/- व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, मध्वर्ती शासकीय इमारतीसमोर,उस्मानाबाद यांनी केले आहे.