नळदुर्ग -: येथील श्री जगदंबादेवी देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जिर्णोध्दार समितीच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त शनिवार दि. 5 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता नळदुर्ग येथील प्राचीन अंबाबाई मंदिरात घटस्थापना होणार आहे. रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भव्य खुल्या रांगोळी स्पर्धा होणार असून या स्पर्धत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेते स्पर्धकास आकर्षक पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता आराधी मंडळाचा कार्यक्रम होणार असून मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता भारुडाचा कार्यक्रम होईल. बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराम पोतदार यांचा भक्तीगीतीचा कार्यक्रम होणार आहे. तर गुरुवार दि. 10 ऑक्टोबर रोजी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा ठेवण्यात आले असून याचदिवशी सायंकाळी पाच वाजता महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता ह.भ.प. महेश महाराज कानेगांवकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याचबरोबर रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी दिवशी सायंकाळी चार वाजता नळदुर्ग शहरातून देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक, सिम्मोलंघन होणार आहे. यादिवशी दुपारी चार वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवाच्या कालावधीत मनोजसिंह हजारी, रत्नाकर कुलकर्णी, राजकुमार खद्दे, जाधव बंधू, संजय मोरे, दत्तात्रय दासकर, विजयकुमार धरणे, दयानंद जाधव, दयानंद पुदाले आदींच्यावतीने प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
नळदुर्ग येथील श्री अंबाबाई मंदीर हे अतिशय प्राचीन व जागतृ देवस्थान आहे. मागील वर्षापासून मंदीराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु आहे. अनेक भाविक भक्तांनी मोठ्या मनाने मदत केलेली आहे. यावर्षीही जिर्णोध्दाराचे काम सुरु असून दानशूर भाविकांनी याकामी सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन श्री जगदंबा देवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट, श्री अंबाबाई जिर्णोध्दार समिती व नळदुर्ग नवरात्र महोत्सव कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.