मुंबई -: सिनेसृष्टीतील प्रसिध्द गायक सोनू निगमला दाऊद इब्राहीम गँगचा सदस्य छोटा शकील याच्याकडून धमकीचे फोन व मॅसेज येत आहे. याप्रकरणी सोनू सोनू निगमने मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे.
सोनू निगमने वर्ल्ड टूरसाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी करार केला आहे. हा करार रद्द करुन दुबईतल्या अल्ताफ नावाच्या व्यक्तीच्या कंपनीशीच करार करावा, अन्यथा रेकॉर्ड केलेले विशिष्ट फोन कॉल जाहीर करून बदनामी करण्याची धमकी सोनू निगमला येत आहे. सोनू निगम ऐकत नाही आणि फोन घेणे टाळत आहे हे पाहून छोटा शकीलकडून धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
परदेशात असलेल्या सोनूकडून लवकरच पत्राच्या स्वरुपात लेखी तक्रार आमच्याकडे येईल. ही तक्रार दाखल करुन घेऊ आणि सोनू निगमच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ते उपाय करू व योग्य ती कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.