बेळगाव -: बेळगावच्या दोन युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोबाईल अँप्लिकेशन तयार केले आहे. संकटात सापडलेल्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अँप्लिकेशन तयार करण्यात आले असून मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याद्वारे संकटात सापडलेल्या महिलेने आपला मोबाईल चार ते पाचवेळा शेक केल्यास फीड करुन ठेवलेल्या पाच मोबाईल नंबरांना मेसेज व लोकेशन मिळणार आहे.
डॉ. अमित पाटील, डॉ. प्रकाश दिवाण या बेळगावच्या दोन युवकांनी हे अँप्लिकेशन तयार केले आहे. महिलांवर होणारे बलात्कार, अत्याचारांना आळा घालण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अँप्लिकेशन तयार केले आहे. डॉ. अमित पाटील यांनी प्रकाश दिवाण यांच्यासमवेत आपल्या टीमच्या सहाय्याने हे अँप्लिकेशन साकारले आहे. कोणत्याही अँड्राईड मोबाईलमध्ये हे अँप्लिकेशन डाऊनलोड करताना मोबाईलधारकांनी पाच ओळखीच्या व्यक्तींचे मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
अडचणीच्या वेळी ही सेवा डाऊनलोड केलेला मोबाईल पाचवेळा शेक केला असता संबंधित पाच व्यक्तींना मेसेज पाठविला जातो. तसेच जीपीए प्रणाली द्वारा संबंधित व्यक्तीचा ठाव ठिकाणही कळतो. महिलांच्या सुरक्षेसाठी हे नवीन अँप्लिकेशन लाभदायक ठरणार आहे. www.fikrfee.com या संकेतस्थळावरुन हे अँप्लिकेशन मोफत डाऊनलोड करता येणार आहे.