बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पावसाच्या अनियमिततेमुळे साखर उद्योग अडचणीत सापडले व साखरेचे भाव गगनाला भिडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ऊसाचे क्षेत्र घटले असल्याने यंदाचा गळीत हंगाम होणार की नाही अशी चिंता साखर उद्योजकांना असतांनाच बार्शी तालुक्यातील सर्वसामान्यांना मात्र आर्यन शुगर्सने दिलासा दिला आहे.
बार्शीतील टाकणखार रोड येथे सुरु केलेल्या साखर विक्री केंद्रात थेट ग्राहकांसाठी २८५० रुपये प्रति क्विंटल, १४५० प्रति ५० किलोस व किरकोळ विक्री २९ रुपये ५० पैसे दराने साखर विक्री सुरु केली आहे. यामुळे आता गरिबांची दिवाळी गोड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
केवळ सर्वसामान्य शेतक-यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा, त्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लावावा, तसेच केवळ कारखाना सुरु करतो, अशा थाप मारण्यापेक्षा प्रयत्क्षात कारखाना उभा करुन शेतक-यांच्या ऊसाचा प्रश्न निकाल काढत आर्यन शुगर्सने शेतक-यांचा विश्वास संपादन केला आहे. कोटयावधी रुपयांची गुंतवणूक करुन नफा नुकसानीचा विचार न करता शेतक-यांचे हित जोपासून आर्यन शुगर्सने यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे. सध्या बाजारात 30 ते 35 रुपये दरात साखर उपलब्ध आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.