उस्मानाबाद :- सोयाबिन व कापूस पिकावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने किडीच्या नियंत्रणासाठी शेतक-यांनी खालील उपाय योजना करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याने प्रादुर्भावग्रस्त भाग काढून टाकावा व पिक काढणीनंतर पिकाचे अवशेष नष्ट करावेत. कापुस पिकावरील रसशोषक कीडीसाठी डायफेनथूरॉन 50 एस. सी.  1.2 ग्राम किंवा बुप्रोफेझीन 25 टक्के एस.सी. 1 मिली प्रतीलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सदरील किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी किटक नाशकाची मात्रा 3 पट करावी.
      स्पोडोप्टेरा तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या अंडी पुंज व समुहातील अळयावर लक्ष ठेवून स्पोडोप्टेरा व हेलिकोव्हर्पाच्या पतंगासाठी फेरोमन सापळ उभारावेत. किडीच्या आर्थिक नुकसान पातळीवर आधारीत फवारणी करावी. पाने लाल पडल्यास मॅग्नेशीयम सल्फेट 1 टक्का किंवा युरीया 2 टक्काची फवारणी करुन घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.  

 
Top