मुंबई : मोबाईल टॉवरमधून निघणा-या रेडीअशनमुळे नागरीकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होत असून या टॉवरबाबत शासनाने योग्य ती कारवाई करावी यासाठी अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती जुही चावला यांनी सोमवारी मंत्रालयात मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया यांची भेट घेतली. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आर.ए.राजीव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.
मोबाईल टॉवरमधून निघणा-या रेडीएशनमुळे शहरवासियांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होणार असून या टॉवर संदर्भात महापालिकेने योग्य ती कारवाई करावी, टॉवरमधील रेडीएशनचा स्तर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत आदी मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
मोबाईल टॉवरबाबत राज्य शासनाने एकत्रित धोरण आणले असून ते नागरीकांच्या प्रतिक्रिया, सूचना मागविण्यासाठी नगरविकास विभागाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार आहे. नागरीकांच्या आरोग्याच्या काळजीला प्राधान्य असून मोबाईल टॉवरबाबत उद्योग क्षेत्र, टाटा कॅन्सर हॉस्पीटल, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, विविध सिटीजन ग्रुप यांची एकत्र परीषद ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल आणि त्यावर सर्वसमावेश अशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.
सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुख्य सचिवांनी अभिनेत्री जुहीचे अभिनंदन करीत संपुर्ण देशाला भेडसावणा-या कुपोषण सारख्या सामाजिक समस्येवर सक्रीयपणे काम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्य सचिवांनी जुही चावला यांना केले.