बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी विविध प्रकारचे कौशल्य उपजल अथवा सरावाने प्राप्त होते. जगण्याची धडपड करणारे अनेक जिद्दी व्यक्ती आपणास पहावयास मिळतात. छोट्या मुंलांसाठी कागदापासून बनविण्यात येणारे खेळण्यातील म्हणा अथवा सायन्सचे छोटेशे प्रात्यक्षिक मुलांना समजाऊन सांगण्यासाठी कागदाच्या पंख्याची निर्मिती करुन विक्री करण्याचा व्यवसाय करुन एक कुटूंब आपली उपजीवीका करत आहेत.
उदरनिर्वाहासाठी सतत भ्रमती करणारे अनेक छोटे व्यावसायिक वेगवेगळी कला जोपासून फिरता व्यवसाय करीत आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथून आलेल्या ४० वर्षीय राजू सिंग चित्तोरिया हे आपली पत्नी दोन मुली, एक मुलगा, मेहुणा या कुटूंबासह विविध ठिकाणी फिरुन आपला व्यवसाय करत आहे. सध्या बार्शीतील भवानी पेठेतील भवानी मंदिराच्या जवळ त्याचा ठिय्या असून उत्सव काळापर्यंत बार्शीत आपली उपजीवीका करुन पुढील प्रवास सुरु होणार आहे. दिवसाकाठी केवळ ६० ते ८० पंखे त्यांच्या कुटूंबाकडून तयार करण्यात येतात. मात्र त्याची मागणी दररोज सुमारे १०० ते १५० पंख्यांची असते. हातचे कौशल्य व सरावाने बनविलेल्या पंख्याला प्रत्येकी १० रुपये मिळत असून मिळत असेल त्यात आपले समाधान असल्याचे त्याने यावेळी सांगीतले.