कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कोल्हापूरच्या महालक्ष्मीसमोर वादन करण्याचा मान पुण्याच्या रुद्रगर्जना वाद्य पथकास मिळाला आहे. खंडेनवमीच्या मुहुर्तावर दि. 12 ऑक्टोबर रोजी देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत रुद्रगर्जना वाद्यपथक हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
यंदाच्या वर्षी स्थापन झालेल्या रुद्रगर्जना पथकाने पुण्यातील मानाच्या केसरीवाडा गणपती, श्रीमंत भाऊ रंगारी गणपती, हत्ती गणपती, गरूड गणपती समोर वादन सादर केले होते. महालक्ष्मीच्या मिरवणुकीचा मान मिळवणारे रुद्रगर्जना हे पहिले पथक ठरले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या रुद्रगर्जना वाद्य पथकास महालक्ष्मीच्या मिरवणुकीच्या मानामुळे पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुण्यातील गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर रुद्रगर्जना आता महालक्ष्मी समोर वादन करण्यास सज्ज झाले आहे.