सोलापूर -: सोलापूरची कुलस्‍वामिनी श्री रुपाभवानी मंदिर देऊळ ट्रस्‍टच्‍यावतीने 5 ते 18 ऑक्‍टोबरपर्यंत शारदीय नवरात्र महोत्‍सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आल्‍याची माहिती ट्रस्‍टी मल्लिनाथ मसरे यांनी दिली.
        शनिवार दि. 5 ऑक्‍टोबर रोजी दुपारी घटनस्‍थापनेने नवरात्र उत्‍सवास प्रारंभ झाला आहे. श्री देवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबीना, रविवार 6 ऑक्‍टोबर ते शुक्रवार दि. 11 ऑक्‍टोबरपर्यंत दररोज श्री देवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबीना निघणार आहे. शनिवार दि. 15 ऑक्‍टोबर रोजी पुर्णाहुती व सायंकाळी सात वाजता दहिहंडी मिरवणुक निघणार आहे. 
           रविवार दि. 13 ऑक्‍टोबर रोजी महानवमी व विजयादशमी असल्‍याने सकाळी दहा वाजता श्री देवीची पूजा व सायंकाळी चार वाजता सीमोल्‍लंघनाचा कार्यक्रम होईल. यावेळी पालखी मिरवणुक निघणार आहे. ही मिरवणुक तुळजापूर वेस, मंगळवार पेठ, मधला मारुती, विजापूर वेसमार्गे दत्‍ता चौक, मसरे गल्‍ली येथील मंदिरात देवीची आरती होईल. तेथून भोडगे गल्‍लीतील मंदिरात पालखी येईल. तेथे आरती होईल. त्‍यानंतर या मिरवणुकीची सांगता रुपाभवानी मंदिरात हो्ईल.
               शुक्रवार दि. 18 ऑक्‍टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमानिमित्‍त श्री देवीची अलंकार महापूजा होवून भक्‍तगणांना व आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्‍यातील तुळजापूरला पायी जाणा-या भक्‍तांना महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे.

 
Top