लोहारा -: अचलेर (ता. लोहारा) येथील विद्या विकास विद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने उस्मानाबाद येथे झालेल्या लातूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यश मिळविले आहे. तर हा संघ अकोला येथे होणा-या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे यशस्वी विद्यार्थिंनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थिनीनी व्हॉलीबॉल स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविल्याने 'हम भी किसीसे कम नही' हे या स्पर्धेच्या माध्यमातून मुलींनी दाखवून दिले आहे. या संघात संघनायक कु. संजिवनी माने यांच्या नेतृत्वाखाली करिश्मा साखरे, अश्विनी गावडे, पुजा उपासे, अश्विनी पुजारी, रोहिणी माळगे, महादेवी सुतार, लक्ष्मी कमळापुरे, संजिवनी माने, प्रियंका गायकवाड या विद्यार्थिंनीनी उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाचे सादरीकरण केले. या विद्यार्थिनीनी अंतिम सामन्यात लातूर मनपा संघाचा दोन गुणांनी पराभव करुन विजेतेपद खेचून आणले. विजयी संघाचे मुख्याध्यापक एस.एम. गुरव, पर्यवेक्षक बी.डी. बेंडगे, नागनाथ पाटील, स्पर्धा संयोजक दादासाहेब देशमुख, गणेश पवार, शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे. यशस्वी खेळाडू विद्यार्थिनीना विभागप्रमुख बी.एम. राठोड, क्रीडा शिक्षक एस.एस. विभुक्ते आदींसह शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.