वाशी : पोहण्यास गेलेल्या नऊ वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडे सहा वाजता घडकली. . घडली. पोहत असताना इलेक्ट्रीक मोटारच्या पाईपाच्या सहाय्याने वर चढत असताना उघड्या वायरला हात लागून विजेचा धक्का बसला व या बालकाचा मृत्यू झाला.
अनिकेत अशोक निकम हा नऊ वर्षीय बालक वाशी येथील माळी गल्ली येथे असलेल्या विहीरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या विहिरीवर दररोज अनेक लहान, थोर पाहण्यासाठी येतात. त्या प्रमाणे हा निकम नावाचा बालक ही पोहण्यासाठी गेला होता. त्यास पोहायला येत होते. आज त्या विहीरीवर इलेक्ट्रीक मोटार चालू होती. यामुळे दररोजच्या पेक्षा पाणीखाली गेलेले होते. पोहण्याचे झाल्यावर हा बालक पाईपाच्या सहाय्याने वर चढत होता. वर चढत असताना इलेक्ट्रीक मोटार जोडलेल्या उघड्या वायरला त्याचा हात लागला. उघड्या वायरला हात लागता क्षणी या बालकाला जबरदस्त विजेचा धक्का लागला. या मुलाला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषीत केले. सदरील घटनेची वाशी पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट अंमलदार नितीन पाटील हे करत आहेत.