बार्शी : येथील प्रसिध्द व्यापारी व भारतीय जैन संघटनेचे माजी राज्याध्यक्ष ओमप्रकाश (पोपटशेठ) बाफणा यांचे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. जैन गोरक्षण मंडळ, महावीर धर्मार्थ दवाखाना, महावीर जैन स्थानक, वाय.पी.एज्युकेशन, आश्रमशाळा आदी संस्थांचे विश्वस्त असलेल्या बाफणा यांना शारिरीक त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योज मालवली. शुक्रवारी दि.११ रोजी त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघेल. मोक्ष धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.