नळदुर्ग : अणदूर (ता. तुळजापूर) येथे शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी रात्री ऊस लागवड चर्चासत्र घेण्यात आले. अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पांडुरंग आव्हाड यांनी उसाची लागवड, आंतरमशागत, खते, औषधे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणी मुळे होते. अप्पासाहेब शेटे यांनी प्रास्ताविक तर अरविंद घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामचंद्र आलुरे, धनराज मुळे आदींची उपस्थिती होती. शेतकरी संघटनेच्या वार्ताफलकाचे उद्घाटन तानाजी मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.