उस्मानाबाद : सासवड येथे जानेवारी 2014 मध्ये होणार्या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ. मु. शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीचे मराठवाडा साहित्य परिषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने स्वागत केले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बैठक घेऊन स्वागताचा ठराव घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष नितीन तावडे, सचिव बालाजी तांबे, कार्याध्यक्ष राजेंद्र अत्रे, भा. न. शेळके, डी. के. शेख, युवराज नळे, तृप्ती अंधारे, रविंद्र केसकर, रणजीत दुरुगकर, आप्पा सोनवणे, मधुकर हुजरे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.