बार्शी :- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तालुक्यातील अलीपूर येथील निवारा मुक-बधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्‍यांना चित्रकला वही, चित्र काढण्याचे साहित्य व खाऊ वाटप अखील भारतीय महासंघाचे जिल्हा सचिव संदिप भोरे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मधुकर फरतडे, प्रताप नलावडे, दत्ता जाधव, पा.न.निपानीकर, अध्यक्ष बापू पाटील (छत्रपती ग्रुप एसटी स्टॅन्ट चौक), तालुका युवक अध्यक्ष अँड. श्रीकांत सुरवसे, मुख्याध्यापक गुजरे मॅडम या सर्व मान्यावरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
          यावेळी प्राचार्य मधुकर फरतडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, अखिल भारतीय मराठा महासंघाने या मुक-बधिर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य व खाऊ वाटप करुन अतिशय कौतुस्कापद कार्य केले आहे. असे सामाजिक कार्य मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी करत राहावे. या कायासाठी तुम्हाला कुठलीही गरज भासल्यास माझ्याकडे यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हा सचिव संदिप भोरे बोलताना म्हणाले की, महासंघाच्या कार्यकर्त्यांनी असेच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवुन संघटनेची शोभा वाढवावी व बार्शीत ही संघटना अधीक बळकट करावी, असे अहवान केले.
     याच कार्यक्रमात जिल्हा सचिव संदिप भोरे यांच्या हस्ते विनायक आजबे यांची महासंघाच्या तालुका युवक कार्यअध्यक्ष पदी तर लखन सस्ते यांची बार्शी शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करुन त्यांना नियुक्ती पत्र दिली.
    या कार्यक्रमाला संभाजी राऊत (शहरा अध्यक्ष), सुरज गव्हाणे (तालुकाध्यक्ष), गणेश जव्हेरी, गणेश जामदार, सुरज सोलनकर, अमोल जाधव, प्रशांत कांबळे, राम सस्ते, बालाजी महाजन व अ.भा.मराठा महासंघ रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाअधिकारी उपस्थित होते. तर उपस्थितांचे आभार नगरसेविका रिजवाना मुल्ला यांनी मानले.
 
Top