बार्शी -: एचआयव्ही बाधीत मुंलांचा शोध घेऊन संगोपन, पुनर्वसन करण्याचे काम करणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक सालार चाऊस, पो.उ.नि.शोभा पडवळ, मधुकर डोईफोडे, काका सामनगावकर, सुभाष जवळेकर, सुरेश कुंकूलोळ, अजित कुंकूलोळ, मंगलताई शहा, पालवीच्या संस्थापिका डिंपल घाडगे, सचिव आशिष शहा आदि उपस्थित होते.
    बाधित मुलांना विविध कला शिकविण्याचे, उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे पालवीच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी पालवी संस्थेस अभय कुंकूलोळ यांनी १८ हजार रुपयांची देणगी दिली.
 
Top