सोलापूर -:  बुधवारी ललितापंचमीचे औचित्य साधून दाधीच समाजाचे कुलदैवत दधिमथीमातेला 1008 कमलपुष्पे वाहून महापूजा करण्यात आली. सोलापूर येथील चाटीगल्ली परिसरातील समाजाच्या मंदिरात हा कार्यक्रम झाला.
      प्रारंभी सकाळी श्री देवीच्या मूर्तीस अभिषेक, आरती व प्रसाद असे कार्यक्रम झाले. ललितापंचमीस करण्यात येणार्‍या या विशेष पूजेसाठी समाजबांधव एकत्र होऊन भक्तिभावाने पूजन करतात. सकाळपासूनच हा पुष्पार्चन कार्यक्रम सुरू झाला असून, वेदमंत्राच्या जयघोषात ही पूजा होत आहे. घटस्थापना या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रकूटचे पंडित र्शी ब्रिजगोपाल मिर्शा व्यास यांचे र्शीमद्भागवत कथा पारायण सुरू असून रविवारी सायंकाळी सहाला दांडियाचा कार्यक्रम आहे. शनिवार दि. 12 ऑक्‍टोबर रोजी सकाळी आठपासून मोठय़ाप्रमाणात नवचंडी महायज्ञ, होमहवन, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी समाजाचे अध्यक्ष संजीवकुमार व्यास, डॉ. रवींद्र शर्मा, सचिव विठ्ठल दायमा, श्यामसुंदर करेशीया, विजय दायमा यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.
     या देवीच्या पूजेत कमळाच्या फुलांचा मान आहे. शिवाय या धार्मिक कार्यक्रमास सोलापुरात मोठय़ा प्रमाणात फुले मिळत नसल्याने तमिळनाडू येथून मागवण्यात आली आहेत. ही फुले विविध रंग आणि आकाराची आहेत हे यांचे वैशिष्ट्य. ती ताजी व टवटवीत राहण्यासाठी विशेष काळजी घेतली.
 
Top