उस्मानाबाद -: घरगुती वादातून विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत खून केल्याप्रकरणी पती व सासूस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
किरकोळ कारणांवरून 25 ऑक्टोबर 2012 रोजी समीना बेग यांचा पती नसीर मैन्नोद्दीन बेग व सासू हानीफा बेग यांच्याशी वाद झाला. त्या दोघांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा मृत्यूपूर्व जवाब विवाहितेने साहाय्यक फौजदार व्ही. बी. अतकरे यांच्याकडे नोंदविला. शिराढोण पोलिस ठाण्यात पती व सासूविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक सी. आर. कोल्हे यांनी तपास करून याप्रकरणी कळंब न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी समोर आलेला पुरावा तसेच सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी. वाय. जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी पती नसीर बेग व सासू हानीफा बेग या दोघांना भादंवि कलम 302 नुसार जन्मठेप तसेच प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, कलम 498 प्रमाणे 2 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अँड. पी. वाय. जाधव यांनी बाजू मांडली.