बार्शी : आझाद गणेश मंडळाच्यावतीने मधुकर नरके यांच्‍या स्‍मरणार्थ आयोजित केलेल्या रक्तदान व आधार कार्ड नोंदणी शिबीरात ५५ रक्त बाटल्‍यांचे संकलन झाले. १५४ व्यक्तींची आधार कार्ड नोंदणी करण्यात आली.
         यावेळी शिबीरामध्‍ये तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्‍या हस्ते श्री आजोबा गणपतीला प्रथम पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्‍यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक वाळके, डॉ. काका सामंनगावकर, पृथ्वीराज रजपूत, माजी आमदार आण्णा नरके, संजय बरीदे हे उपस्थित होते. मागील १४ वर्षांपासून आझाद गणेश मंडळाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मंडळातील कार्यकर्त्‍यांमुळेच दरवर्षी या सामाजिक कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर यावर्षी नागरिकांची गरज लक्षात घेता उस्‍मानाबादचे मोरे यांच्‍यातर्फे आधार कार्ड नाव नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. या सामाजिक कार्याचे तहसीलदार सोमवंशी यांनी कौतुक केले तर भविष्‍यातही असे उपक्रम राबिवण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
    कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मंडळातील रुपेश सदावर्ते, राहूल शिराळ, कुणाल नरके, सचिन गायकवाड, लखन रजपूत, संदिप शिराळ, मयुर गलांडे, संतोष खोगरे, रामचंद्र ढोले, सोमनाथ गाभणे, रामगलांडे आदींनी परिश्रम घेतले. नागेश गाभणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
 
Top