बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सहकारी साखर कारखाना बंद पाडणारे तेच, स्वत:चा खाजगी साखर कारखाना काढणारे तेच, जिल्हा मध्यवर्ती बँकेतून स्वत: संचालक असतांना कर्ज घेणारे तेच, आणि कारखान्याचे कर्ज बुडविण्यासाठी कारखान्याची विक्री करण्याचा डाव करणारे हेच आणि त्यांनाच पुन्हा मंत्रीपदही दिले जाते ही फार मोठी शोकांतिका असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
सोमवारी सकाळी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बार्शी तहसिलवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांतिक सदस्य सुभाष आण्णा डुरे पाटील, संजय पाटील घाटणेकर, मराठवाडा विभागाचे सत्तारभाई पटेल, शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत पंके, डॉ. गौतम जगताप, वैराग शाखाध्यक्ष काकासाहेब कोरके, उपाध्यक्ष गोविंदराव पंके, सचिव विद्याधर गव्हाणे, नानासाहेब पाटील, प्रकाश गुंड, अरुण कुलकर्णी, काकासाहेब पाटील व शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलतांना सदाभाऊ खोत म्हणाले, सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना येरवडा जेलमध्ये घालून त्यांची नार्को चाचणी करा आणि पहा भारत देशात सोन्याचा धुर निघेल. वालचंद साखर कारखान्यासारख्या खाजगी कारखान्याला सहकारी करणारे कुठे आणि सहकारी कारखाने बंद पाडून खाजगी करणारे कुणीकडे. उजनी धरण बांधण्यापूर्वी चंद्रभागेत हाताची ओंजळ करुन पांडूरंगा मला माफ कर असे म्हणणारे यशवंतराव कुणीकडे आणि त्यांच्याच विचारानं राजकारण करतो म्हणत उभ्याने धारची भाषा वापरणारे कुणीकडे आहेत. वीजेचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, उसाच्या दराचा प्रश्न, शेती मालाच्या हमीभावाचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. सहकार चळवळ उध्वस्त करुन सहकारी साखर कारखाने बंद पाडले आहेत व स्वत:चे खाजगी साखर कारखाने उभे केलेत त्यांना जाब विचारला पाहिजे. शेतकर्यांनी कष्टाने ऊस जगवला आणि या साखर कारखानदारांना दिला परंतु कोणी दोनशे, कोणी पाचशे रुपये दर कमी देऊन खिसा कापला. एकीकडे हेच कारखानदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कोट्यावधी रुपये कर्ज घेत आहेत व त्यामुळे शेतकर्यांना कर्जपुरवठा होत नाही. बंद पडलेला भोगावती सहकारी साखर कारखाना आम्ही चालविण्यास तयार आहोत त्यापूर्वी संचालकांची घरंदारं लिलावात काढा आणि पूर्णपणे कर्जमुक्त करा, अशी मागणी आमची राहील असेही त्यांनी यावेळी म्हटले.
तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात आर्यन व इंद्रेश्वर साखर कारखान्याने शासनाच्या हमीभावाप्रमाणे रक्कम मिळावी, बार्शी फळ व भाजीपाला मार्केटध्ये १० टक्के आडत घेतली जाते ती बंद करावी, वीज मंडळाकडून होणारे भारनियमन बंद करावे, उजनीचे पाणी मिळावे, नदीवर बंधारे बांधले त्यात पाणी सोडावे, आजारी साखर कारखाने सुरु करावे, विविध घोटाळ्यांची चौकशी व्हावी, दुष्काळी पॅकेजचे सहाय्य मिळावे, ठिबक सिंचन व स्प्रिंकलर सेट देण्यात यावे, वृध्द शेतकर्यांना मासिक पेन्शन, निराधार लाभार्थ्यांची शासनाची सहाय्यता निधी बंद असल्याने त्याची चौकशी करावी, जिल्हा मध्यवर्तीकडून शेतकर्यांना कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.