पांगरी : चुलत्याच्या सावडण्‍याचा कार्यक्रम आटोपुन बार्शीकडे दुचाकीवरून परत चाललेल्या पुतण्‍याचा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकच जागेवरच मृत्यु झाल्याची घटना रविवार दि. 13 ऑक्‍टोबर रोजी सकाळी दहा वाजण्‍याच्या सुमारास बार्शी काटेगांव मार्गावर आगळगांव शिवारातील बोरगांव फाटयाजवळ घडली.
    अशोक लक्ष्मण धालगुडे (रा. मांगडे चाळ बार्शी) असे अपघातात जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्याचे नांव आहे. रामचंद्र नवनाथ गरड (रा. आगळगांव) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, मयत अशोक धालगुडे हे त्यांचे कडकनाथवाडी (ता. वाशी) येथील चुलत्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या तिस.या दिवसीचा कार्यक्रम आटोपुन कडकनाथवाडी येथुन काटेगांव आगळगांव मार्गे बार्शीकडे येत असताना त्याची दुचाकी क्रमांक एम.एच.13 एटी 5889 हीस कोणत्या तरी अज्ञात वाहनाने पाठीमागुन जोरदार धडक दिली. अपघातात धालगडे हे गंभीर जखमी झाल्यामुळे व अति रक्तस्त्राव झाल्यामुळे जागेवरच मयत झाले. गरड यांच्या खबरीवरून अज्ञात वाहनचालकांविरूदध अपघात करून एकाच्या मृत्युस कारणीभुत ठरून पळुन गेल्याबदल गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top