पांगरी (गणेश गोडसे) : अंबेजवळगे (ता.जि.उस्मानाबाद) येथील न्यु इंग्लिशच्या विदयार्थांनी तालुका व जिल्हा स्तरावर घवघवीत यश संपादन केले असुन प्रशालेतील विदयार्थांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. उस्मानाबाद येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटात प्रियंका रोकडे हिने शंभर मिटर धावणे प्रकारात तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमंक मिळवला असुन तिची विभागीय स्तरावर होणा-या स्पर्धांसाठी जिल्हयातुन निवड झाली आहे. तसेच सुवर्णा कोळगे हिने 14 वर्षाखालील वयोगटात 400 मिटर धावणे प्रकारात तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला असुन तिचीही विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
  तालुकास्तरावर नेत्रदिपक यश मिळवणारे इतर विदयार्थी असे : शंभर मिटर धावणे सुरज चौगुले तालुक्यात दिवीतीय, 200 मिटर धावणे बालाजी जाधव तालुक्यात दिवीतीय, नम्रता बिरंजे दिवीतीय, 400 मिटर धावणे शरद धुपे तालुक्यात प्रथम, प्रियंका रोकडे प्रथम, इतर यशस्वी विदयर्थी असे : शरद धुपे, ऋषीकेश देवकते, शकिलख्‍ मुजावर नंदिनी राठोड, लांब उडी स्‍पर्धेत कृष्णा जाधव, श्‍वेता यादव, मोठया गटात 100 मिटर धावणे प्रथम निशा साबळे, पायका स्पर्धेत 100 मिटर धावणें प्रथम प्रियंका रोकडे, दिवतीय निशा साबळे, 400 मिटर धावणे प्रियंका रोकडे प्रथम, विजय शिंदे दिवीतीय, 800 मिटर धावणे प्रथम मनिषा कोळगे, थाळीफेक स्‍पर्धेत नाझीरा शेख, उंच उडी स्‍पर्धेमध्‍ये निशा साबळे प्रथम.
      यशस्‍वी विदयार्थांचे सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ पांगरीचे अध्यक्ष मोहन नारकर सचिव शशिकांत नारकर, चेअरमन मनुकाका कुलकर्णी, संचालक प्रतिक नारकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी कोकाटे यांनी अभिनंदन केले. विदयार्थांना क्रिडा शिक्षक जावेद बागवान यांच्यासह प्रशालेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
 
Top