मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बकरी ईद अर्थात 'ईद-उल-अज्हा’ निमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचप्रमाणे राज्याच्या व्यापक हितासाठी एकत्रित येऊन काम करण्याचा संकल्प यानिमित्ताने आपण सोडूया असेही म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, ईद-उल-अज्हा हा सण त्याग, विश्वास आणि क्षमाशील वृत्ती या गुणांचे प्रतीक आहे. स्वार्थ सोडून त्याग करण्याची वृत्ती अंगी बाणवावी हा संदेश हा सण देतो. बंधुभाव वाढीस लावणे आणि शांतता तसेच सौहार्दासाठी काम करीत राहणे यासाठीची प्रेरणा या सणामधून आपल्याला मिळते. महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक सलोख्याची एक मोठी परंपरा आहे. राज्याच्या विकासाला अतिशय पूरक अशी ही बाब आहे हे लक्षात घेता आपण सर्वजण या निमित्ताने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करुया.
या पवित्र दिनी आपण सगळे त्याग, ईश्वराप्रती प्रेम आणि समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याची समर्पण वृत्ती अंगिकारण्याची शिकवण देऊ या, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.